Murder Pudhari
बेळगाव

Karnataka Crime : घरासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या तरुणाचा गळा चिरून खून

देवरहिप्परगी तालुक्यातील जालवाद गावातील घटना

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : घरासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील जालवाद गावात ही घटना घडली. इसाक बागवान (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्रीच्या वेळी घरासमोरील कट्ट्यावर झोपलेला असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा चिरून खून केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच देवरहिप्परगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुनाचे कारण व आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेची नोंद देवरहिप्परगी पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT