बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी (दि. ११) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटले.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. तसेच, राज्याच्या विकासासाठी सहकार्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेऊन राज्याला अधिकाधिक निधी मिळवून देण्याचे आवाहन केले.