बेळगाव : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर असून बेळगाव जिल्ह्याचा निकाल 80.32 टक्के असून त्यात 15 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी 65.37 टक्के लागला होता. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल यंदा 83.10 टक्के लागला असून 16 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षी 66.76 टक्के निकाल लागला होता. दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांची टक्केवारी वाढली असली तरी स्थानात बदल झालेला नाही. यंदा बेळगाव 26 व्या स्थानी, तर चिकोडी जिल्हा 24 व्या स्थानी आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 19,635 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15,771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्हा 26 व्या स्थानी आहे. टक्केवारीत 14.95 अंकांनी सुधारणा केली आहे. त्याचप्रमाणे चिकोडी शैक्षणिक जिल्हा निकाल 83.1 असून 24 व्या स्थानी आहे. निकालात 16.34 टक्के अंकांनी सुधारणा केली.
गोगटे पदवीपूर्व कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी कुलकर्णीने 600 पैकी 599 (99.83) गुण घेऊन राज्यात दुसरा आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. विज्ञान विभागात केएलई इंडपेंडट पदवीपूर्व कॉलेजचा विद्यार्थी समीर कल्लापूर 600 पैकी 596 (99.33) गुण घेऊन जिल्ह्यात विज्ञान विभागात पहिला आला आहे.