Drought Pudhari
बेळगाव

Karnataka Drought : दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक ३ पासून राज्यात

तीन दिवस पाहणी दौरा; राज्यातील पीक नुकसानीची करणार पाहणी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : राज्यातील तीव्र दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे केंद्रीय आंतर-मंत्रालयीन अभ्यास पथक ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान राज्याचा दौरा करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने १० अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून कृषी खात्याचे सहसचिव अजितकुमार साहू तिचे अध्यक्ष आहेत.

राज्यातील १४.४३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी तीन उपपथकांची रचना करण्यात आली आहे. अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पहिले पथक तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगिरी आणि विजयनगर जिल्ह्यांना भेट देईल. डॉ. सुधाम बाग यांच्या नेतृत्वाखालील दुसरे पथक हसन, म्हैसूर, चामराजनगर आणि मंड्या जिल्ह्यांमधील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. डॉ. मानसिंग यांच्या नेतृत्वाखालील तिसरे पथक यादगीर, रायचूर, बागलकोट आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहे.

३ ऑक्टोबर रोजी सकाळी बंगळूरमध्ये दाखल होणारे केंद्रीय पथकाचे सदस्य, राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक प्राथमिक बैठक घेतील. त्यानंतर ते निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन, पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी शेते आणि जलाशयांना प्रत्यक्ष भेट देतील. दुष्काळाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर ते केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT