Fake currency 
बेळगाव

Karnataka Fake Note Racket: ‘बंगळूर दक्षिण’मध्ये बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्ध्वस्त

सातजणांना अटक : ऐजूरमध्‍ये नवीन बंगल्‍यात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूर दक्षिण जिल्ह्यातील ऐजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या एका बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी छापखान्यावर छापा टाकून ७ जणांना अटक केली असून बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. संतोष (३५), सतीश (३६), संपत (३३), राजेश (३४), रेणुकाराम (३१), शिवराज (४२), गोविंदराज (५०) अशी याप्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

रामनगर टाऊनमधील ऐजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नवीन बांधलेल्या बंगल्‍यात बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांनी छापा टाकून सातही आरोपींना ताब्यात घेतले. छपाईच्या प्रक्रियेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटांच्या कागदाचे बंडल आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहेत.

या प्रकरणी ऐजूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT