milk price pudhari photo
बेळगाव

Karnataka Milk Sale Price: दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपये वाढ होणार?

नंदिनी दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपये वाढ करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेवर आता आणखी एका दरवाढीचा भार टाकण्याची तयारी सुरू झाली असून राज्यातील दूध उत्पादक संघांच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नंदिनी दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपये वाढ करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

दूध उत्पादक सहकारी संघ व काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याबरोबरच दूध उत्पादकांना दिले जाणारे अनुदान वाढवावे, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुधाच्या दरात सुधारणा करण्यासंदर्भात अधिकृत प्रस्ताव सादर करण्याची सूचना राज्य सहकारी दूध उत्पादक महासंघाला केली आहे.

याबाबत केएमएफने प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुधाच्या दरवाढीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दूध उत्पादक महासंघाचे संचालक असलेले काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा व नारायणस्वामी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा, भुसा, कडबा यासह सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी दूध खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT