बंगळूर : राज्य सरकारने बियरवरील अबकारी कर 10 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश मंगळवारी दिला असून सात दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा, असे सांगितले आहे.
राज्यात बियरवरील अतिरिक्त अबकारी कर उत्पादन खर्चाच्या 195 टक्के आहे. तो 205 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बियरची किंमत दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढ बिअरच्या ब्रँडनुसार बदलणार आहे. यापूर्वी बियरसाठी दोन स्तरावर करप्रणाली होती.
कमी स्तरावरील ब्रँडसाठी प्रतिलिटर 130 रुपये कर लागू केला जात होता. तर इतर ब्रँडसाठी शेकडानिहाय कर आकारला जात होता. आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. सर्व बियरसाठी समान 205 टक्के कर निश्चित करण्यात आला आहे. सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार व्हिस्की, जीन आणि रम यासह विविध मद्याच्या किमतीत वाढ होणार आहे.