बंगळूर : एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला शुक्रवार, दि. २१ रोजी अटक केली आहे. राघवेंद्र (वय ३५, रा. तळघट्टपूर) असे संशयिताचे नाव आहे. अभिनेत्रीच्या बहिणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे राघवेंद्र याने ही ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली तळघट्टपूर पोलिस ठाण्यात पीडितेविरुद्ध प्रति-तक्रारही दाखल केली आहे. यावेळी मिळालेल्या तक्रारीवरून राघवेंद्र व पीडिता एकाच संस्थेत काम करत होते. तसेच राघवेंद्र हा एक जिम ट्रेनरदेखील आहे. राघवेंद्र याने पीडितेच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिचे खासगी फोटो स्वतःकडे ठेवले. व ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची सतत धमकी देत पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे आरोप पिडीतीने तक्रारीत केले आहेत.
दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल फोन व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे