Accident 
बेळगाव

Karnataka Accident : सिंदगीजवळ दोन कारची धडक; दोघे ठार

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील यरगळ गावाजवळ दोन कारची जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील यरगळ गावाजवळ दोन कारची जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर काहीजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

दीपक चिक्कलगार आणि मस्तान शेख अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे कारच्या पुढील सीटवरून प्रवास करीत होते. या कारमधील प्रवासी मुधोळ येथून गुलबर्गाकडे जात होते. टाटा नेक्सॉनमधील प्रवासी गुलबर्गा येथून हुबळीकडे जात असल्याचे सांगण्यात आले. चालकाचे लक्ष विचलित झाल्यामुळे अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

अपघाताची माहिती मिळताच सिंदगीचे सीपीआय सुनील मुलिमनी, उपनिरीक्षक श्रीकांत कांबळे, एएसआय शिवलिंग बतगौडर, पोलिस कर्मचारी मनोहर बडिगेर आणि भीमू लमाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद सिंदगी पोलिस ठाण्याच्या झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT