accident file photo
बेळगाव

Karnataka Accident : राजहंसगडचा तरुण दुचाकी अपघातात ठार

बेळगाव-गोवा महामार्गावरील प्रभूनगरजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : मित्रांसोबत धाब्यावर जेवण करुन घरी परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीला अपघात होऊन तो जागीच ठार झाला. मंगळवारी, (दि. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास बेळगाव-गोवा महामार्गावरील प्रभूनगरजवळ हा अपघात झाला.

नारायण परशराम कुंडेकर (वय ३७, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. नारायण हा आपल्या दुचाकीवरुन तर त्याचे मित्र कारमधून गणेबैलजवळील धाब्यावर जेवणासाठी आले होते. जेवण करुन परतताना रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नारायणची दुचाकी घसरली. डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर मार लागला. त्यातच तो जागीच ठार झाला. याबाबत खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT