Accident News Pudhari
बेळगाव

Karnataka Accident: टिप्परखाली सापडून चालक ठार

क्वारीतील क्रशरजवळ दगड उतरविण्यासाठी थांबविलेला टिप्पर अचानक उतारावरुन घसरल्याने त्याखाली सापडून चालक ठार झाला

पुढारी वृत्तसेवा

कारवार : क्वारीतील क्रशरजवळ दगड उतरविण्यासाठी थांबविलेला टिप्पर अचानक उतारावरुन घसरल्याने त्याखाली सापडून चालक ठार झाला. अंकोल्याजवळ (जि. कारवार) ही दुर्घटना घडली. मारुती नायक (वय ५१) असे मृताचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मारुती टिप्परचालक म्हणून राजू काळस यांच्याकडे काम करीत होते. दगड भरुन घेऊन ते मालकासमवेत संबंधित क्वारीत गेले होते. टिप्पर क्रशरजवळ थांबवून ते समोरच जाऊन थांबले होते. तर मालक राजू क्वारी कार्यालयात गेले होते. उतारावर थांबविलेल्या या टिप्परच्या चाकाजवळ कोणत्याही प्रकारचा अडथळा लावण्यात आला होता. त्यामुळे, टिप्पर हळूहळू उतारावरुन खाली आले. ते इतक्या वेगाने आले की समोर उभे असलेले मारुती नायक त्याखाली सापडले. टिप्परचे चाक अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची नोंद अंकोला पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT