धारवाड : विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगोळ्ळी रायण्णा नगर येथे झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा विद्यागिरी पोलिसांनी एका २८ वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १६ हजारांची रोकड जप्त केली आहे.
रहिवाशी रामू हंजागी हे १९ नोव्हेंबररोजी रात्री घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना, चोरांनी मागच्या दाराने घरात शिरून दागिने आणि रोकड चोरली होती. पोलिसांनी काही दिवसांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. गंगाप्पा पाथरोटी उर्फ बेनाकट्टी (२८) असे त्याचे नाव असून, तो मूळचा बागलकोटमधील नवानगरचा रहिवासी असून सध्या धारवाडमधील गांधीनगर येथील बंदेम्मा मंदिराजवळ राहतो. तो कार चालक म्हणून काम करतो.