Teacher (Pudhari file photo)
बेळगाव

Karnataka Teacher Recruitment : डिसेंबरअखेरपर्यंत १७ हजार शालेय शिक्षकांची भरती

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : येत्या डिसेंबरअखेरपर्यंत राज्यात १७ हजार शालेय शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली. ते बुधवार दि. १४ रोजी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मंत्री बंगाराप्पा यांनी या भरतीमुळे शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. भाजपच्या सत्ताकाळात प्रलंबित राहिलेल्या १३ हजार ५०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिवाय अनुदानित शाळांमध्ये ६ हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी अर्थ विभागाने मंजुरी दिली आहे.

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. सरकारी शाळांचे पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर करण्यासाठीही आम्ही मोठे पाऊल उचलले आहे. खासगी भागीदारीतून सरकार अधिकाधिक पब्लिक स्कूल सुरू करत असून ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक स्तरापासूनच इंग्रजी शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे.

उच्च शिक्षण व रोजगारामध्ये ग्रामीण भागातील मुलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार पब्लिक स्कूलना प्राधान्य देत आहे. सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या काळात तसेच विद्यमान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या कार्यकाळातही आरोग्य व शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे. सरकारकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देऊनही ग्रामीण भागातील मुलांचा सरकारी शाळांमधील प्रवेश लक्षणीयरीत्या घटला होता.

सरकारी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने शिक्षण व रोजगारामध्ये ७.५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारला असून एसएसएलसी व पीयूसी परीक्षांमध्ये अधिक संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होण्यास मदत झाली असल्याचे त्यांन म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT