बेळगाव : विधानसभा अध्यक्ष यु. टी. कादर यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजात सहभागी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एच. के. पाटील व अन्य. Pudhari Photo
बेळगाव

Karnataka Doctor Recruitment |महिनाभरात भरणार डॉक्टर्स, परिचारिकांची पदे

आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव : सरकारी कोट्यातून 1,500 डॉक्टरांची भरती

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील सामुदायिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुका रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि फार्मासिस्टची रिक्त पदे एका महिन्याच्या आत भरण्यासाठी पावले उचलली जातील, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.

विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी (दि. 11) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार दोड्डनगौडा पाटील यांनी आरोग्य खात्यातील रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री गुंडूराव यांनी उत्तर दिले. आरोग्य खात्यातील 337 तज्ज्ञ डॉक्टर आणि 250 वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आधीच परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कोट्यातून 1,500 डॉक्टरांची भरती करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

ज्यांंतर्गत शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर आणि तज्ज्ञांना एक वर्षाची सक्तीची सरकारी सेवा मिळेल. वित्त विभागाने विभागात मंजूर असलेल्या 120 तज्ज्ञ आणि 100 वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे थेट भरतीद्वारे भरण्यास सहमती दर्शविली आहे आणि ही प्रक्रिया देखील प्रगतीपथावर आहे, असे त्यांनी सांगितले.

विशेषज्ञ डॉक्टरांच्या भरतीबाबत उच्च न्यायालयात सुरु असलेला खटला देखील अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच तो निकाली काढला जाईल. राज्यात 600 नर्सिंग अधिकारी, 400 कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि 400 फार्मासिस्ट पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. विभागात आवश्यक तेथे समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल, असे गुंडुराव यांनी सांगितले. यावेळी भाजप आमदार सुनीलकुमार, अरग ज्ञानेंद्र यांनीही सूचना केल्या.

प्रतिनियुक्ती रद्द करणार

विविध विभागांमध्ये नियुक्तीवर गेलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर आणि अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा अधिकार्‍यांची नियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा विभागात आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाईल, असे मंत्री गुंडूराव म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT