Prarthana Biradar Patil 
बेळगाव

Karnataka 10th results: अथणीची प्रार्थना राज्यात अव्वल

दहावीत 625 पैकी 625 गुण : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श

पुढारी वृत्तसेवा

अथणी : अथणी तालुक्यातील कटगेरी सरकारी हायस्कूलची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार-पाटीलने दहावीत 625 पैकी 625 म्हणजे सर्व विषयांत 100 टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यासह बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असून, हे यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे.

मर्यादित साधनसामग्री आणि स्पर्धेचे वाढते आव्हान या सर्वांवर मात करत प्रार्थनाने ही कामगिरी केली. नियमित उजळणी, वेळेचे नियोजन आणि स्वअभ्यासावर दिलेला भर यामुळेच तिने पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा विक्रम घडवला. खासगी शिकवणीशिवाय तिने हे यश संपादन केले आहे. प्रार्थनाने यापूर्वी घेण्यात आलेल्या टॅलेंट परीक्षेतही जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तिचे मूळ गाव हल्याळ (ता. अथणी) असून ती अथणी येथे वास्तव्यास आहे.

मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे ‌‘नीट‌’ उत्तीर्ण करणार आहे. मी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेतच घेतले. शाळेत शिकवलेले नीट समजून घेतल्यानंतर रोज घरी त्याची उजळणी केली. मेहनत आणि सातत्य यावर माझा विश्वास होता.
- प्रार्थना बिरादार-पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT