निपाणी : माजी आ. काकासाहेब पाटील यांचे मंगळवारी दि. 17 रोजी निधन झाले. शुक्रवारी दि. 20 रोजी सकाळी 8.30 वा. वाळकी येथे रक्षाविसर्जन होणार असून दुपारी 3 वा. निपाणीतील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आ. चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.