Arrest Pudhari
बेळगाव

Belgaum crime: जुगार अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक

कागवाड पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऐनापूर- कुडची रेल्वे पुला दरम्यान जुगार खेळणाऱ्या ठिकाणी कागवाड पोलिसांनी शनिवार दि. २ रोजी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून रोख ३ हजार ६०० रुपये आणि ४ दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

झाकीरहुसेन अल्लाउद्दीन रूकुडी (वय ४२), महिमउद्दीन साहेबलाल पिनीतोड (वय २८), तौसिफ रुक्मुद्दीन करीमखान(वय ३२), राजू गोपाळ गस्ती (वय ४३), झाकीरहुसेन अब्बासअली सांदारवाले ( वय ४२, सर्व रा. कुडची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कुडचीजवळील रेल्वे पुलाजवळ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, अथणी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एस. खोत, उपनिरीक्षक कुमार देसाई यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT