बेळगाव ः बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन पोलिसप्रमुख म्हणून कोडगूचे पोलिसप्रमुख के. रामराजन यांची नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसांत ते आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.
राज्यातील तब्बल 48 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढतीवर बदली झाल्याचा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बजावला आहे. यामध्ये बेळगावच्या पोलिप्रमुखांचाही समावेश आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा पोलिसप्रमुखपदी कार्यरत असलेले डॉ. गुळेद यांना डीआयजीपदी बढती मिळाली आहे. ते आता गुप्तचर विभागाचे डीआयजी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी के. रामराजन यांची नियुक्ती झाली आहे. ते 2017 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी हुबळी-धारवाड व बंगळूरमधील कमांड सेंटरचे डीसीपी म्हणून काम केले आहे.