बेळगाव

जीप-ट्रकच्या धडकेत कर्नाटकात 13 ठार

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : पंक्चर होऊन रस्त्याकडेला थांबलेल्या सिमेंटवाहू ट्रकला जीपने धडक दिल्याने 13 जण ठार झाले. त्यात नऊ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. चिक्कबळ्ळापूरजवळ गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत आंध्र प्रदेशचे आहेत.

अनंतपूर जिल्ह्यातील हे मजूर कामासाठी बंगळूरकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाने ट्रकला धडक दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी एस. पी. नागेश यांनी दिली. दसरा सण संपवून हे सर्वजण कामासाठी बंगळूरकडे परतत होते. पहाटेच्या वेळेला धुके होते. त्यामुळे रस्त्यावर थांबलेले वाहन जीप चालकाला दिसून आले नाही. यामुळे अपघात घडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT