बेळगाव : राज्यातील राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा थांबताना दिसत नाही. आपणही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
शिमोगा येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी मी देखील प्रतीक्षा करत आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह सुमारे 10 जण या शर्यतीत उभे आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी राजकारणात इच्छुकांची संख्या मोठी असणे स्वाभाविक आहे. मात्र याचा अर्थ असा नाही. की, लगेच मुख्यमंत्री बदलले जातील.
राजकारणात प्रत्येकाला संधी मिळते. मात्र ती संधी मिळेपर्यंत संयम राखणे गरजेचे आहे. सध्या मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताही प्रश्न उद्भवला नसला तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपणही एक प्रबळ स्पर्धक असल्याचा संदेश त्यांनी या विधानातून दिला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकरणात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.