Chandgad Murder Case: जंगमहट्टीतील महाविद्यालयीन तरुणाचा प्रेमसंबंधातून खून Pudhari
बेळगाव

Chandgad Murder Case: संशयिताच्या मैत्रिणीलाही अटक; खुनाचा गुन्हा

जंगमहट्टी खून प्रकरण : स्वप्नवेल पॉईंटच्या दरीतून मृतदेह काढला बाहेर

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : जंगमहट्टीतील (ता. चंदगड) हर्षद प्रकाश हुंदळेकर या महाविद्यालयीन तरुणाचा प्रेमसंबंधातून खून करण्यात आला. खून झाल्यानंतर सहाव्या दिवशी गुरुवारी (दि. ३) सायंकाळी चार वाजता तिलारीनगरजवळील स्वप्नवेल पॉईंटच्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. विशेष म्हणजे खून प्रकरणातील मुख्य संशयित कीर्तीकुमार कुट्रेची मैत्रीण उषा परशराम नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून हत्या केल्याच्या या प्रकरणात कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८) या मुख्य संशयितासह दिलीप उर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय २९), श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय २४, तिघेही रा. जंगमहट्टी) यांना चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत सात दिवस पोलिस कोठडी मिळाली. तर गुरुवारी संशयित कीर्तीकुमारची मैत्रीण उषा परशराम नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. उषाने इंस्टाग्रामवरुन कॉल करुन हर्षदला पार्लेत (ता. चंदगड)बोलावून घेण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक विवेक पाटील, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने तपास सुरु आहे. मृत हर्षदची दुचाकी दिलीप उर्फ लहू कंग्राळी, यमनापूर (ता. बेळगाव) येथील मित्राकडे ठेवून आला होता. ही दुचाकीही गुरुवारी जप्त करण्यात आली.

या प्रकरणात या प्रकरणाचा तपास गतीने सुरु असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, या कटासाठी आणखी कोणी मदत केली आहे का, त्याचा शोध लावून गुन्हेगारांना कडक कारवाई करु, असे पोलिस उपाधीक्षक पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT