International Youth Day 
बेळगाव

International Youth Day : मोडून गेल्या जुनाट वाटा..!

जुने साचे सोडून ‘जेन झी’ने बदलली जीवनशैली

पुढारी वृत्तसेवा
ज्ञानेश्वर पाटील

बेळगाव : आजची जेन झी पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल वातावरणात घडत आहे. डिजिटल क्रांतीमुळे यांच्या आवडीनिवडी, विचारसरणी आणि जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. वरवर उथळ वाटणारी ही पिढी अजिबात उदासीन नसून कमालीची वास्तववादी आहे. जुन्या साच्यात अडकण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व, मानसिक शांतता आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देत ही तरुण पिढी नव्या वाटा शोधत क्रांती घडवण्यास सज्ज आहे.

नव्‍या तरुण पिढीला नात्यात बंधनांपेक्षा पर्सनल स्पेस आणि आदर हवा असतो. करिअरची अनिश्चितता सांभाळताना भावना दुखावण्यापेक्षा नाती हळुवार ठेवणे त्यांना सोयीचे वाटते. कौटुंबिक दबावातून केलेले लग्न किंवा नात्यातील ‘अधिकार गाजवणे’ या पिढीला अजिबात मान्य नाही. लांबलचक रडक्या टीव्ही मालिका आणि जाहिरातींचा अडथळा यांना नकोसा वाटतो. त्याऐवजी ३० सेकंदांचे रील्स, यूट्यूब शॉट्स आणि ओटीटीवर स्वतःच्या वेळेनुसार बिंज-वॉचिंग करणे यांना आवडते.

खाद्यसंस्कृतीत रोजचा पारंपरिक स्वयंपाक टाळून नवीन कॅफे, वेगवेगळ्‍या प्रदेशातील खाद्यसंस्‍कृतीचा मिलाफ असलेला फ्युजन फूड आणि झोमॅटो-स्विगीवरून ऑन-डिमांड जेवण मागवण्याला यांची पसंती आहे.

आम्हाला आवडीनुसार करिअर घडवण्यात आणि ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ जपण्यात जास्त रस आहे. नाती असोत की नोकरी, मानसिक शांतता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.
- ओम पाटील, अभियांत्रिकी विद्यार्थी, बेळगाव
आम्ही जुन्या रुढी-परंपरांना न मानता स्वातंत्र्य आणि वैयक्तिक अवकाशाचा आदर करतो. सोशल मीडियामुळे सामाजिक विषयांवर बेधडकपणे मत मांडणे ही आमची ताकद आहे.
- रामेश्वरी बस्तवाडकर, महाविद्यालयीन युवती, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT