Bullet Train  
बेळगाव

India's First Indigenous Bullet Train : पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन साकारतेय बंगळुरात

ताशी २४९ किमी वेगाने धावणार : तंत्रज्ञानातील बदलामुळे रेल्वेची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : भारतीय रेल्वेचे वेगवान प्रवासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असून देशातील पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनची निर्मिती बंगळूर येथील 'बीईएमएल'च्या उत्पादन प्रकल्पात सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गासाठी तयार होत असलेली ही बुलेट ट्रेन ताशी २४९ किलोमीटर वेगाने धावणार आहे. रेल्वे तंत्रज्ञानातील बदलामुळे रेल्वेची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बुलेट ट्रेनच्या चाचणीवेळी कमाल वेगमर्यादा ताशी २८० किलोमीटर तर नियमित प्रवासाचा वेग ताशी २४९ किलोमीटर असेल. सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये आठ डबे असतील. चार मोटारकार आणि चार ट्रेलरकार अशी त्यांची रचना आहे. ट्रेनमधून एकावेळी सुमारे ५५७ प्रवाशांना प्रवास करता येईल. भविष्यात आठ डबे जोडून १६ डब्यांची ट्रेन चालविण्याची सुविधाही असणार आहे.

प्रवासासाठी आधुनिक सुविधा

या बुलेट ट्रेनमध्‍ये भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आसनांची रचना करण्यात आली आहे. एलईडी प्रकाशयोजना, साहित्‍यासाठी स्वतंत्र रॅक, मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगसाठी पॉवर आउटलेट, आधुनिक स्वच्छतागृह आणि प्रत्येक आसनाच्या रंगीत मोठ्या खिडक्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT