बंगळूर : बंगळूर बाहेरील अनेकलजवळील हिलालिगे गावात शुक्रवारी ( दि. 6) रात्री घडलेल्या घटनेने पोलिसांना धक्का बसला आहे. पोलिस नेहमीप्रमाणे स्टेशनवर ड्युटीवर होते. यावेळी, एक व्यक्ती बॅग घेऊन आला, त्याने त्यातली मुंडके काढले आणि टेबलावर ठेवत मी खून केला आहे आणि मला अटक करा, असे सांगितले. या घटनेने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना धक्का बसला.
पत्नीला तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने तिचा गळा चिरून हातात घेऊन सूर्यनगर पोलिस स्थानकात आत्मसमर्पण केले. हेन्नागर येथील रहिवासी शंकर यांनी त्याची पत्नी मनसा हिचे मुंडके कापून दुचाकीवरून घेऊन गेल्यानंतर सूर्यनगर पोलीस ठाण्यात आला. शंकर आणि मनसा पयांचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे जोडपे फक्त एक महिन्यापूर्वीच हिलाली गावात भाड्याच्या घरात राहायला गेले होते. शंकर दि. 3 रोजी रात्री कामासाठी बाहेर गेला होता. त्याने त्याच्या पत्नीला सांगितले होते की, तो सकाळी परत येईल. पण शंकर रात्री उशिरा घरी परतला. या काळात त्याच्या पत्नीची फसवणूक उघडकीस आली.
यावेळी त्याला त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवताना आढळली. यामुळे संतापलेल्या शंकरने दोघांवरही हल्ला केला. मनसा हिचा गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी आरोपी शंकर याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.