विजापूर : नारळ पाणी विकणार्या महिलेने बँक मॅनेजरला हनीट्रॅप ओढून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागली. या प्रकरणात एक यूट्यूब पत्रकारही सहभागी आहे. दि. 12 नोव्हेंबरला बँक मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनंतर इंडी पोलिसांनी या महिलेसह अमूल होनसुरे, महेश बगली, तौसिफ खरोशी यांना अटक केली आहे.
इंडी येथील डीवायएसपी कार्यालयाशेजारी ही महिला अनेक वर्षे नारळ पाणी विक्री करत होती. या महिलेने इंडी तालुक्यातील एका गावातील बँक मॅनेजरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत 10 लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी या महिलेसह चौघांविरुद्ध इंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.