बेळगाव : राज्य कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांनी पुन्हा अचानक हिंडलगा कारागृहाला भेट देऊन झाडाझडती घेतली. गुरूवारी रात्री साडेआठ ते साडेदहा असे दोन तास मोबाईल, अंमली पदार्थांचा कसून शोध घेतला परंतु, काहीही आढळले नाही.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर होते. त्याच्या आदल्या रात्री म्हणजे गुरूवारी रात्री अलोक कुमार यांनी अचानक हिंडलगा कारागृहाला भेट दिली. हिंडलगा कारागृह प्रशासन, स्थानिक पोलीस कोणालाही याची कल्पना दिलेली नव्हती. या भेटीबाबत त्यांनी गुप्तता पाळली होती.
स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्यासाठी आयुक्तांना याची कल्पना देण्यात आली होती. त्यांच्या सूचनेनुसार महिला ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर, सीसीबीचे मंजुनाथ नायक, सीएसबीचे नंदिश्वर कुंभार यांच्यासह सीएआर विभागातील फौजफाटा मागवून घेतला होता. दोन तासांच्या झडतीत फारसे काही हाती लागले नाही. परंतु, गुटखा पाकिटे, सिगारेट पाकीटे व व्यायामाची साधने दिसून आली. ती जप्त करून येथील अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.