(File Photo)
बेळगाव

Gokak heroin seizure: गोकाकला 50 हजारचे हेरॉईन जप्त

तरुणाला अटक करून त्याच्याकडून तब्बल 50 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त केले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तरुणाला अटक करून त्याच्याकडून तब्बल 50 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त केले. गोकाक शहर पोलिसांनी ही कारवीई केली. अरबाज इस्माईल शाबासखान (वय 25, रा. मोमीन गल्ली, गोकाक) असे संशयिताचे नाव आहे.

सदर तरुण गोकाक शहरातील कोप्प हॉस्पीटलसमोरील खुल्या जागेत अमली पदार्थाची नशा करत असल्याची माहिती गोकाक शहर ठाण्याचे उपनिरीक्षक किरण मोहिते यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता सदर तरुण नशा करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडील अमली पदार्थ तपासला असता ते हेरॉईन असल्याचे आढळून आले.

त्याच्याकडून सुमारे साडेनऊ ग्रॅम हेरॉईन व तो ओढण्यासाठीचे सिल्वर पेपर जप्त केले आहेत. हेरॉईनची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 50 हजार रुपये नोंदवली आहे. गोकाक शहर पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT