Hemant Nimbalkar  Pudhari
बेळगाव

Hemant Nimbalkar : हेमंत निंबाळकर बंगळूर पोलिस आयुक्तपदी

अँटी राऊडी स्क्वॉड आयुक्तपदाचाही अतिरिक्त कार्यभार; गुन्हे नियंत्रणाचीही जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर/बेळगाव : भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी हेमंत निंबाळकर यांची बंगळूर शहर पोलिस आयुक्तपदी (रहदारी) नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक शासनाच्या कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

निंबाळकर १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची तत्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत बंगळूर शहर पोलिस आयुक्त (रहदारी) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे बंगळूर शहर पोलिस आयुक्त (अँटी राऊडी स्क्वॉड) या पदाचा अतिरिक्त कार्यभार व गुन्हे नियंत्रणाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा विभागाचे सहसचिव अक्षय श्रीधर यांनी या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

राज्यातील ३३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ३३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात बेळगाव शहर व जिल्ह्यात काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापूर्वी बेळगावचे आयजीपी म्हणून कार्यरत असलेले विकाशकुमार विकाश यांची पश्चिम बंगळूरचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. बेळगावचे पोलिस आयुक्त राहिलेले डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची बंगळूर उत्तरचे पोलिस आयुक्त, अनुपम अग्रवाल यांची राज्य राखीव दलाचे आयजीपी, डॉ. एम अश्विनी यांची भरती विभागाच्या आयजीपी म्हणून नियुक्ती झाली आहे.

विक्रम आमटे यांची बंगळूर उत्तरचे उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पूर्वी बेळगावला रहदारी व गुन्हे शाखेच्या डीसीपी राहिलेल्या पी. व्ही. स्नेहा यांची आता रहदारी पश्चिम विभाग बंगळूरच्या डीसीपी म्हणून बदली झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT