Lakshmi Hebbalkar Pudhari
बेळगाव

Lakshmi Hebbalkar| माजी देवदासी, मुलांसाठी विशेष योजना : हेब्बाळकर

माजी देवदासी महिलांना अधिक पेन्शन, गृहनिर्माण, आरोग्य आदी उत्पन्नात भर टाकणारे उपक्रम व पतपुरवठा सुविधा पुरवल्या जाणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : माजी देवदासी व त्यांच्या मुलांसाठी एक विशेष पॅकेज योजना तयार करुन सरकारला सादर करण्यात आल्याची महिती महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत देवदासी सर्वेक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

त्या म्हणाल्या, माजी देवदासी महिलांना अधिक पेन्शन, गृहनिर्माण, आरोग्य आदी उत्पन्नात भर टाकणारे उपक्रम व पतपुरवठा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच 45 वर्षांवरील माजी देवदासी महिलांना पेन्शन दिली जात आहे. कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाने 2013-14 पासून आतापर्यंत एकूण 13,663 माजी देवदासी महिलांना 30 ते 50 हजारपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील माजी देवदासी महिलांचे सर्वेक्षण करून एकूण 46,660 माजी देवदासी महिलांची ओळख पटवली आहे. 2024-25 मध्ये अर्थसंकल्पीय घोषणेनुसार राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करुन 23,395 माजी देवदासी महिलांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर फेरसर्वेक्षण करुन माजी देवदासी महिलांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पिढीत एकूण 90,092 मुले असून त्यांच्या शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उत्पन्न मिळवण्याचे प्रशिक्षण व पतपुरवठा सुविधा पुरवण्यासंदर्भात एक कृती आराखडा तयार करून समाज कल्याण विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT