Cucumber Pudhari
बेळगाव

Belgaum market: उष्णता वाढली अन्‌‍ काकडी कडाडली

बेळगाव बाजारातील स्थिती : बटाटा, कांदा, कडधान्ये दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्याची उष्णता जाणवू लागली आहे. परिणामी बाजारात काकडी, शहाळ्यासह फळांना मागणी वाढली आहे. काकडीचा दर 40 रुपये प्रतिकिलोवरून 50 ते 60 रुपयांवर गेला आहे. शहाळे दरही 50 वर पोचला असून, सोनकेळी दर 50 ते 100 रुपये झाला आहे. भाजीपाल्यांचे दर मात्र काहीसे उतरले आहेत. टोमटो दर 20 ते 30 रूपये आहे. मेथी, लालभाजी एक जुडी 5 रुपये आहे. तर हिरवी मिरचीचा किलोचा दर 80 ते 100 रूपये आहे.

होलसेल बाजारपेठेत भाजीपाला आवक वाढली आहे. टोमॅटोचा ट्रे 200 ते 300 रुपये आहे. एपीएमसीत शनिवारी कांदा दर प्रति क्विंटल 1,000 ते 2,000 रुपये होता. बाजारात 80 ट्रक कांद्याची आवक झाली असून प्रति किलोचा दर 20 ते 25 रूपये आहे. बटाटा प्रती क्विंटल 2,000 ते 2,500 रुपये दर आहे. किलो दर 25 ते 35 रुपये आहे.

धान्य (प्रति क्विंटल)

भात : 2,600 ते 2,700, बार्शी ज्वारी : 4,200 ते 4,600, विजापूर ज्वारी : 4,600 ते 5,600, हायब्रीड ज्वारी : 3,000 ते 3,500, गहू क्र. 1 : 3,000 ते 4,200, शेंगदाणा : 7,500 ते 7,800

तांदूळ : साधा तांदूळ 3,000 ते 3,200, स्टीम हंसा : 4,000 ते 4,500, बासमती तुकडा : 3,400 ते 3,500, सोना मसुरी 4,000 ते 4,500, रॉ राईस : 4,200, कुमुद तांदूळ : 7,200 ते 7,500, बेळगाव बासमती 7,400 ते 8,400, दिल्ली बासमती 11,500, ते 12,200

डाळी (प्रति किव्ंटल)

तूरडाळ : 12,450 ते 13,200, हरभराडाळ : 8,500, मूगडाळ : 11,000 ते 12,000, मसूरडाळ : 6,500 ते 7,400, उडीदडाळ : 14,400 ते 15,000 , हरभरा : 8,000 ते 8,500, जवारी मसूर : 13,000, ते 14,000, नाशिक मसूर : 15,000 ते 16,000, मूग : 9,000, मटकी : 11,000 ते 11,500..

भाजी (दहा किलो) :

टोमॅटो : 200 ते 300, वांगी : 250 ते 350, सिमला मिरची : 200 ते 350, जवारी मिरची : 500 ते 700, बटका : 350 ते 450, गवार (हायब्रीड) : 250 ते 300, गवार (जवारी) : 400 ते 550, भेंडी : 200 ते 250, बिन्स : 400 ते 500, कोबी : 80 ते 100, फ्लॉवर : 200 ते 250, काकडी : 350 ते 450, कारली : 300 ते 350, भोपळा क्विंटल : 1,000 ते 1,800, आले ः 1,500, इंग्लिश गाजर : 250 ते 350.

पाले भाजी : भाजी (प्रति 100 जुडी)

कोथिंबीर : 500 ते 700, पुदिना : 200 ते 250, पालक : 200 ते 300, मेथी : 500 ते 600, लालभाजी : 400 ते 500, शेपू : 300 ते400, कांदापात : 300 ते 400, मुळा पेंढी गठ्ठा : 20 ते 25.

फळे (प्रति किलो)

सफरचंद : 180 ते 280, चिकू : 80 ते 100, संत्री : 80 ते 100, पेरु : 80 ते 100, केळी डझन : 50 ते 60, जवारी केळी : 80 ते 120, पपई : 30 ते 60, किवी (तीन नग) : 80 ते 120, द्राक्षे ः 80 ते 100, डाळिंब: 250 ते 350, मोसंबी : 100 ते 150

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT