बेळगाव

War impact: आखातातील चाकरमान्यांना प्रतीक्षा युद्धबंदीची

कडोलीतील युवकालाही फटका : विमान तिकीट बुकिंग रद्द

पुढारी वृत्तसेवा

कडोली : इराण-अमेरिका युद्ध सध्या पेटले आहे. याचा फटका आता आखाती देशात कार्यरत असणाऱ्या चाकरमान्यांना बसत आहे. सुट्टीवर आलेले काहीजण गावातच अडकून पडले आहेत. त्यांना युद्ध संपण्याची प्रतीक्षा लागली आहे.

कडोलीतील रवी होनगेकर कतारमध्ये नोकरीला आहे. तो कडोलीला 27 फेब्रुवारी रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर आला. त्याच दिवसापासून युद्धाला सुरुवात झाली. तो 26 मार्च रोजी कतारला परतणार होता. मात्र, युद्धामुळे त्याला कंपनीने अद्याप बोलावले नाही. तो कामावर परतण्याची प्रतीक्षा करत आहे. तो कतारमध्ये एका नामांकित कंपनीत अनेक वर्षांपासून कामाला आहे. मी 25 मार्च रोजी गोव्याहून विमानाने कतारला रवाना होणार होता. परतीचे तिकीट बुकींग केलेले होते. युद्धामुळे तिकीट बुकींग रद्द झाले आहे.

मात्र, युद्धामुळे अडकून पडलो आहे. कंपनीतून माहिती मिळाल्यानंतरच कतारला परतणार आहे. सध्या भारतातून मुंबई, हैदराबाद येथून कतारला विमानसेवा सुरु आहे. मात्र, गोव्याहून विमानसेवा सुरु नाही, असे त्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT