बेळगाव : राज्य सरकारच्या हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा तीन महिन्यांचा हप्ता मे महिन्यात दिला जाणार असल्याची दिला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. त्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, फेब्रुवारी व मार्च महिन्यातील गृहलक्ष्मीचा निधी देण्यात आलेला नाही. हा निधी चालू महिन्यात दिला जाणार आहे. पुढच्या आठवड्यात आणखी दोन महिन्यांचे पैसे खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करू नये व अफवांवर विश्वासही ठेवू नये , असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून सर्वसामान्यांवर भार टाकला आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. गॅसचे दर वाढले आहेत. तसेच किराणा मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे, राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करणार्या भाजपने आधी केंद्र सरकारला जाब विचारावा, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यातील भाजप नेते भ्रष्ट आचाराचे असून त्यांना केवळ राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात बोलता येते. मात्र, सर्वसामान्यांना भेडसावणार्या समस्यांवर बोलायचे नसते. इंधन व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्या तरी ते मूग गिळून गप्प बसले आहेत. हा दुटप्पीपण जनतेलाही समजून चुकला आहे, असा टोला मंत्री हेब्बाळकर यांनी हाणला.