Crime News file photo
बेळगाव

Belgaum Crime News: पिस्तूलसह 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

आलिशान कारचालकाकडे गाडीत परवाना संपलेल्या पिस्तूलसह सुमारे 27 लाखांचा मुद्देमाल आढळल्याची घटना गोकाक शहरात घडली

पुढारी वृत्तसेवा

गोकाक : आलिशान कारचालकाकडे गाडीत परवाना संपलेल्या पिस्तूलसह सुमारे 27 लाखांचा मुद्देमाल आढळल्याची घटना गोकाक शहरात घडली. शहरातील बसवेश्वर सर्कलमध्ये शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण मोहिते यांनी संशय आल्याने एका कारचालकाला थांबवून चौकशी केली.

या काळ्या रंगाच्या कारवर लाच लुचपत विभागाच्या नामफलकाचा उल्लेख होता. कारचालकाचे रमेश लकाप्पा केसरगोप्प उर्फ चव्हाण (वय 52, रा. महालिंगपूर, ता. रबकवी बनहट्टी, जि. बागलकोट) असे नाव आहे. त्याच्याकडील एक लाख 20 हजार किंमतीचा मोबाईल, 1 लाख 10 हजाराचा आयफोन मोबाईल व रोख रक्कम तसेच 20 ते 25 लाखांची कार जप्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT