Doctor House Theft | डॉक्टरच्या घरातून १४ लाखांचे सोन्‍याचे दागिने लंपास  
बेळगाव

Doctor House Theft | डॉक्टरच्या घरातून १४ लाखांचे सोन्‍याचे दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : एका डॉक्टरांच्या घरातून तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना महांतेशनगरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरकामासाठी येणाऱ्या एका महिलेविरुद्ध माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महांतेशनगर येथील रहिवासी डॉ. अरुणकुमार गणपय्या शेट्टी (वय ५५) यांनी माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २० एप्रिल ते ९ जून २०२६ या कालावधीत त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यात ६० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, ९६ ग्रॅम वजनाच्या आठ सोन्याच्या बांगड्या तसेच ७० ग्रॅम वजनाची लॉकेटसह सोन्याची साखळी यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत १३ लाख ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरकामासाठी येणारी महिला महादेवी लमाणीने हे दागिने चोरल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. त्यानुसार माळमारुती पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चोरी गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT