Liquor Seizure: रणकुंडयेत गोवा बनावटीचे मद्य जप्त Pudhari
बेळगाव

Liquor Seizure: रणकुंडयेत गोवा बनावटीचे मद्य जप्त

अबकारी खात्याची कारवाई : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अबकारी खात्याने रणकुंडयेजवळ (ता. बेळगाव) छापा टाकून गोवा बनावटीचे मद्य आणि एक कार असा एकूण 3 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल रविवारी (दि. 22) जप्त केला आहे.

अबकारी पोलिस निरीक्षक मंजुनाथ मळ्ळीगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला. गोवा राज्यातून रहदारी कमी असलेल्या मार्गाने कारमधून मद्यसाठा आणण्यात येत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली. अबकारी खात्याच्या पोलिसांनी रणकुंडयेजवळ सापळा रचून हे मद्य जप्त केले आहे. कारची तपासणी केली असता त्यात 205 लिटर गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. पोलिसांनी हे सर्व मद्य जप्त केले आहे.

पोलिसांना पाहून चालकाने कार तेथेच सोडून पलायन केले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT