Fraud Case file photo
बेळगाव

Fraud Case: निवृत्त शिक्षिकेला फसवणारी टोळी जेरबंद

२४ कोटींची फसवणूक; दिल्ली, मुंबईतून पाच जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : निवृत्त शिक्षिकेला डिजिटल जाळ्यात अडकवून २४ कोटी रुपयांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यात सीसीबी पोलिसांना रविवारी यश आले. गौरव कुमार व ओम प्रकाश (रा. मुंबई, व दिल्ली) यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजी नगरच्या रहिवासी असलेल्या लक्ष्मी राममूर्ती यापूर्वी दुबई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या सेवानिवृत्त होत्या. बंगळूर व मुंबई येथील आपली मालमत्ता विकून अमेरिकेत असलेल्या मुलांकडे त्या जाणार होत्या. मात्र या पैशांवर डोळा ठेवलेल्या सायबर गुन्हेगारांनी लक्ष्मी यांना सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल केला व तुम्ही पैशांचे अवैध हस्तांतरण केले आहे. तुमच्या बँक खात्यातील पैशांचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही कोणाशीही न बोलता पडताळणीसाठी सर्व पैसे पाठवायला सांगितले. त्यामुळे त्यांनी आरटीजीएसद्वारे सर्व पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले.

गेल्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत त्या गुन्हेगारांनी लक्ष्मी यांना सातत्याने धमक्या देत टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये २४ कोटी रुपये हस्तांतरित करवून घेतले. दरम्यान च्या तपासात असे उघड झाले की २२ बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र त्यांनी अधिक पैशांसाठी आग्रह धरला होता.

परिणामी लक्ष्मी आपल्या घरातील सुमारे १ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या कँटोन्मेंट शाखेत आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने पाहून बँक व्यवस्थापकाला काहीसा संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. सीसीबी सायबर क्राईम पोलिसांनी तात्काळ येउन लक्ष्मी यांची चौकशी केली असता सुरवातील काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या लक्ष्मी यांनी नंतर घडला प्रकार पोलिसांकडे कथन केला. सीसीबी तात्काळ गुन्हा दाखल करून देशातील विविध शहरांमध्ये लपून बसलेल्या पाच मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT