बेळगाव

निपाणी : शनी मंदिर जीर्णोद्धारासाठी 10 लाख निधी मंजूर

दिनेश चोरगे

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  आदर्शनगर येथील शनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले व खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या पत्राचे वितरण नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते करण्यात आले.

2009 मध्ये कै. प्रकाश रूडगी यांनी येथे छोटेखानी मंदिराची उभारणी केली. त्यानंतर मंदिरासभोवती छोटासा हॉल बांधण्यात आला. दरम्यान, या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव निधी मंजूर करावा, यासाठी नगरसेविका कावेरी मिरजे व सागर मिरजे यांनी मंत्री शशिकला जोल्ले व खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

यावेळी सभापती राजू गुंदेशा, माजी सभापती सद्दाम नगारजी, नगरसेविका कावेरी मिरजे, सागर मिरजे, प्रणव मानवी, विजय टवळे, प्रसाद औंधकर, दीपक माने, राजू जाधव, गजराज चौगुले आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT