जिल्हा बँक अध्यक्षपदावरून माजी खासदार कत्ती पायउतार Pudhari Photo
बेळगाव

जिल्हा बँक अध्यक्षपदावरून माजी खासदार कत्ती पायउतार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

माजी खासदार आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (बीडीसीसी) अध्यक्ष रमेश कत्ती यांनी शुक्रवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. चिकोडी मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीतील पडसाद बीडीसीसी बँकेच्या कारभारावर पडले होते. रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात निवडणुकीनंतर खटके उडत होते. पण, कत्ती यांनी इन्कार केला होता. निवडणुकीचा बँकेच्या कारभारावर परिणाम होत नाही, असे सांगितले होते; पण गुरुवारी (दि. 3) झालेल्या बँकेच्या बैठकीला कत्ती अनुपस्थित राहिले. त्यानंतर पुन्हा चर्चांना वेग आला होता. बँकेतील 14 संचालक कत्ती यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याआधीच शुक्रवारी कत्ती यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यामुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच रमेश कत्ती यांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

महिनाअखेर नवा अध्यक्ष

महिनाअखेर नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. वरिष्ठांचे मत आजमावून नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. नवा अध्यक्ष एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. राज्यात मोठी बँक असा लौकिक असलेली बीडीसीसी बँक सक्षम आहे. शेतकरी आणि ग्राहकांचे हित जोपासण्यात आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT