Crime News pudhari photo
बेळगाव

Hotel Murder Case | फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन मुलींची हत्या करून बापाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : दोन दिवसांच्या वास्तव्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या बापाने आपल्या दोन लहानग्या मुलींची हत्या करून नंतर जीवन संपवनेचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बंगळूरमध्ये उघडकीस आली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणातून त्याने हे कृत्य केल्याचा संशय असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलींचे गळे दाबून खून केल्यानंतर त्याने स्नानगृहात जाऊन स्वतःचा गळा कापून घेतला.

देवनहळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारच्या ताज हॉटेलमध्ये ही घटना सोमवारी घडली. खुनी बापाचे नाव एस. जी. इम्रान (वय ४०, राहणार बिलालनगर, नागवरा, मेन रोड, बंगळूर) असे असून, शेख जोहरा (वय ५) व शेख झोया (वय १०) अशी त्याच्या दोन मुलींची नावे आहेत. इम्रानविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रानला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्यांची भांडणे होत असत. त्या भांडणातूनच इम्रान रविवारी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास आला होता. मुलींसोबत मरण्याचा निर्णय घेऊनच त्याने हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली असावी. त्या खोलीत इम्रानने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत दरवाजा न उघडला गेल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःकडील चावीने दरवाजा उघडला असता खाटावर दोन्ही मुलींचे मृतदेह पडले होते. तर इम्रान स्नानगृहात गळा चिरलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT