गदग जवळ बस-कारचा भीषण अपघात; कुटुंबातील ४ जणांचा मृत्‍यू  Pudhari Photo
बेळगाव

Gadag Accident : गदग जवळ बस-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बस आणि कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गदग जिल्ह्यातील कोन्नुर येथे आज (रविवार) पहाटेच्या सुमारास घडला. रुद्रापा अंगडी (वय 55), पत्नी राजेश्वरी (45), मुलगी ऐश्वर्या (16), मुलगा विजय (12) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. (Gadag Accident)

कल्लपूर येथील बसवेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन हुबळीला परतणाऱ्या कारणे परिवहन मंडळाच्या बसला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. नरगुंद पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून, घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT