Crime News | ब्लॅकमेलर तोतया पोलिस, यू ट्यूबर्सना अटक 
बेळगाव

Crime News | ब्लॅकमेलर तोतया पोलिस, यू ट्यूबर्सना अटक

पोलिस असल्याचे सांगून चौघांनी ६० हजार उकळले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पोलिस असल्याचे सांगून एकाकडून तीन लाख रुपये मागत ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर जीडी टीव्ही नामक सोशल मीडियावर संबंधिताचा व्हिडीओ व्हायरल केला. या प्रकरणी संबंधिताने हुक्केरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिस व पत्रकार असल्याचे सांगत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या चौघांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये संपूर्ण यू ट्यूबर्सचा कल्लाप्पा बसवाणी माळज (रा. अंजनेयनगर, हुक्केरी), एम २ यूट्युबर्सचा मल्लिकार्जुन सिद्धाप्पा जुल्फी (रा. नागरमुन्नोळी, ता. चिकोडी), जेडी यू-ट्यूबर्सचे पृथ्वीराज नारायण चौहान (मूळ रा. माणगाव, ता. चंदगड सध्या रा. न्यू वंटमुरी) व डेव्हीड जाकोब तंगेराळ (रा. गणेशपूर, बेळगाव) यांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती अशी की, महबूब जमादार (रा. कोटबागी) यांच्याकडे काकती येथील एकाने जबरदस्तीने गांजाच्या दोन पुड्या देऊन त्या बदल्यात एक हजार रुपये घेतले. नेमक्या याचवेळी पाठीमागून कारमध्ये चौघेजण आले. त्यांनी फिर्याददाराला बाजूच्या शेतात नेले. आम्ही पोलिस आहोत, तू गांजा विकत असल्याचे दिसून आले आहे, असे म्हणत त्याच्याकडील गांजाच्या दोन्ही पुड्या घेऊन त्या खोलून त्याचा व्हिडीओ घेतला. यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये घालत हुक्केरी पोलिस ठाण्यापासून काही अंतरापर्यंत नेले. पोलिसांत एफआयआर करून तुला हिंडलगा कारागहात पाठवतो, अशी धमकी दिली. हे जर नको असेल तर २ ते ३ लाख रुपये दे, असे ब्लॅकमेलिंग सुरू केले. शेवटी या चौघांनी त्यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. यानंतर त्यांनी केलेला व्हिडीओ जीडी टीव्ही या समाजमाध्यमांवर व्हायरल केला. जमादार यांनी आपल्याला पोलिस व पत्रकार असल्याचे सांगून रक्कम लुटल्याची फिर्याद हुक्केरी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून उपरोक्त चौघा संशयितांना अटक केली. त्यांना हुक्केरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिस प्रमुख आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे उपअधीक्षक रवी. डी. नायक, हुक्केरीचे पोलिस निरीक्षक एस. आर. गणाचारी, पोलिस एम. एन. मसगुप्पी, एम. एस. कब्बूर, आर. एम. फडतरे, आर. आय. हनुमन्नवर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT