बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये विमान वाहतुकीशी संबंधित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच विमानसेवेत वाढ करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी केंद्रीय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली.
मंत्री जारकिहोळी यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत? ? मंत्री नायडू यांची भेट घेतली. उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड, बेळगाव आदी जिल्हे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून या जिल्ह्यांमध्येही विमानतळांची सुधारणा करावी, अशी विनंती त्यांनी मंत्री नायडू यांच्याकरडे केली. विमानतळांच्या विकासासाठी बांधकाम खात्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.