B. Nagendra
नागेंद्र यांना १८ जुलैपर्यंत ईडी कोठडी file photo
बेळगाव

नागेंद्र यांच्यामार्फत ६० कोटींचा गैरव्यवहार? १८ जुलैपर्यंत ईडी कोठडी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महर्षी वाल्मीकी विकास महामंडळात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी सलग चाळीस तासांची तपासणी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि. १२) माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बी. नागेंद्र यांना ताब्यात घेतले. त्यांच्यामार्फत सुमारे ६० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने त्यांची अधिक चौकशी केली जात असून आज त्यांना १८ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

गेल्या १० जुलैपासून दोन दिवस ईडी अधिकाऱ्यांनी बी. नागेंद्र यांच्या घर आणि कार्यालयावर छापे घालून तपास सुरू केला होता. सलग चाळीस तासांपेक्षा अधिक काळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या निकटवर्तीयांचीही त्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिक चौकशीसाठी नागेंद्र यांना ताब्यात घेण्यात आले. तपास सुरू असल्याने नागेंद्र यांच्यासह त्यांचे कुटुंबीय घरातच होते. वाल्मीकी महामंडळामध्ये सुमारे १८७ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे नागेंद्र यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पण, त्यांचा स्वीय साहाय्यक हरीश याने दिलेल्या माहितीची नोंद ईडी अधिकाऱ्यांनी करून घेतली असून नागेंद्र यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे. हरीशही इडीच्या ताब्यातच आहे. हरीश याने दिलेल्या माहितीनुसार काही पुरावे हाती लागले आहेत.

SCROLL FOR NEXT