बेळगाव

Vehicle collision: वाहनाच्या धडकेत वीजखांब भुईसपाट

यळेबैलमधील प्रकार : वीजपुरवठा ठप्प, बगॅसवाहू ट्रकने धडक दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

राकसकोप : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वीजखांब भुईसपाट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार यळेबैलमध्ये बुधवारी (दि. 11) पहाटे तीनच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

म्हाळुंगेतील साखर कारखान्यातील बगॅस वाहतूक यळेबैलमार्गे मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ट्रकमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात बगॅस भरण्यात येतो. या मार्गावरुन वीजवाहिन्या गेल्या आहेत. त्याचा स्पर्श बगॅसवाहू ट्रकना होतो. यातून वारंवार दुर्घटना घडत आहेत. याच प्रकारातून बुधवारी मध्यरात्री सदर घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वाहनाच्या धडकेत रस्त्याच्या बाजूचे दोन वीजखांब मोडून पडले आहेत. यामुळे कोणताही अनर्थ घडला नसला तरी परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी ग्रामस्थांनी याबाबतची माहिती हेस्कॉम अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी लागलीच धाव घेत परिसरातील वीजपुरवठा पहिल्यांदा सुरळीत केला. त्यानंतर दुरुस्तीकामाला सुरुवात करण्यात आली. असे प्रकार रोखण्यासाठी ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक बगॅसची वाहतूक करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

ट्रकमधून बगॅसची वाहतूक करण्यात येते. त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बगॅस भरण्यात येतो. यातून वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक बगॅसची वाहतूक करण्यात येऊ नये. अन्यथा गाड्या थांबवून आंदोलन करण्यात येईल.
- वैजनाथ पाटील, अध्यक्ष, ग्रामस्थ पंच कमिटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT