ED raid
बंगळूर, म्हैसुरात बिल्डरांवर 'ईडी'चे छापे file photo
बेळगाव

बंगळूर, म्हैसुरात बिल्डरांवर 'ईडी'चे छापे

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बंगळूर आणि म्हैसूर शहरातील बिल्डर्सना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी धक्का दिला. दोन्ही शहरांतील ११ ठिकाणी एकाचवेळी छापे घालून बेहिशेबी मालमत्तेबाबत तपास करण्यात आला.

बंगळुरातील युती सिटीतील किंगफिशर टॉवर, मल्लेश्वरम, बसवेश्वरनगर, बन्नीरघट्टा रोड, हनुमंतनगर, म्हैसुरातील दोन ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांनी छापे घालून कागदपत्रांची तपासणी केली. प्लॉट देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणे, मालमत्तापत्रात गैरव्यवहार, रिअल इस्टेट मालमत्तेच्या दरात गैरप्रकार, कर चुकवेगिरी असे अनेक आरोप असणाऱ्या बिल्डर्ससची यादी ईडीने तयार केली होती. त्यानुसार सर्व बिल्डर्सच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाचवेळी छापे घातले.

छाप्यांमागे बिल्डर्सच्या निकटवर्तीयांचाच हात

छाप्यांमागे बिल्डर्सच्या निकटवर्तीयांचाच हात असल्याचे समजते. बिल्डर्सच्या गैरप्रकारांविरुद्ध त्यांनी ईडीला माहिती दिली होती. त्यानुसार संबंधितांची माहिती संग्रहित करून छापे घालण्यात आले. काही महिन्यांपूर्वी बेकायदा आर्थिक देवाण-घेवाणीवरून ईडीने छापे घातले होते. ११.५ कोटींची बेकायदा रक्कम ईडीने जप्त केली होती.

SCROLL FOR NEXT