Bribe Case Pudhari
बेळगाव

Dharwad Bribe case: वाणिज्य कर उपायुक्त लोकायुक्तांच्या जाळ्यात

धारवाड शहरातील वाणिज्य कर विभागाचे उपाायुक्त भरतकुमार हेगडे लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले

पुढारी वृत्तसेवा

धारवाड : शहरातील वाणिज्य कर विभागाचे उपाायुक्त भरतकुमार हेगडे लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदार विश्वजित नायक यांच्याकडून सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लोकायुक्तांनी छापा टाकून त्यांना अटक केली.

अंकोला येथील रहिवासी असलेल्या विश्वजित नायक यांनी 2019 मध्ये 8 टिप्पर खरेदी केले होते. त्यांना 60 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाले होते. नायक यांना मिळालेला इनपुट टॅक्स बेकायदेशीर असल्याचे सांगत वाणिज्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. हेगडे चौकशी करत होते. इनपुट टॅक्स क्रेडिटचा इतर कारणांसाठी वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना चार वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, आज पाचवी वेळ होती. जेव्हा ते चौकशीसाठी आले, तेव्हा त्यांनी पैसे घेऊन प्रकरण बंद करू असे सांगितले गेले होते.

याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. बंगळूर शहर लोकायुक्त एसपी शिवप्रकाश देवराज, डीवायएसपी मल्लिकार्जुन चुक्की, प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या कारवाईत 6 लाख रुपयांची लाच घेताना हेगडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT