बेळगाव

Dharwad-Belgaum Railway : धारवाड-बेळगाव-धारवाड रेल्वेसेवा उद्यापासून

मोहन कारंडे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगावहून धारवाडला व धारवाड़हून बेळगावला नियमितपणे ये-जा करणार्‍या प्रवाशांसाठी विनाआरक्षित विशेष रेल्वेसेवा सोमवार, 6 मार्चपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती खा. मंगल अंगडी यांनी दिली.

धारवाडहून  (Dharwad-Belgaum Railway) सकाळी 8.15 वा सुटणारी रेल्वे बेळगावला सकाळी 10.45 वा. पोहोचेल व बेळगावहून सायंकाळी 7.30 सुटणारी रेल्वे धारवाडला रात्री 9.55 वा पोहोचेल. या रेल्वेगाडीला 22 डबे असणार आहेत. एक फर्स्टकम सेकंड टायर एसी कोच, एक 2 एसी टायर, एक 3 एसी टायर, 11 स्लिपर कोच, 5 जनरल सेकंड क्लास, 2 सेकंड क्लास सामानवाहू डबे असणार आहेत. ही गाडी खानापूर, लोंढा, अळनावर, रेल्वे स्थानकावर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे पुढे धारवाडहून म्हैसूरला 10.10 वाजता जाणार्‍या रेल्वेशी जोड असेल.

SCROLL FOR NEXT