बंगळूर : संपत्तीसाठी मुलीने आईचा खून केल्याची घटना चिक्कमगळूर जिल्ह्यातील एन.आर. पूरम तालुक्याच्या बंडिमठ येथे सोमवारी रात्री घडली. कुसुम (वय 62) असे आईचे नाव आहे. सुधा (वय 35) असे मुलीचे नाव आहे. मजूरीसाठी परगावाहून बंडिमठ येथे हे कुटुंब आले होते.
सोमवारी रात्री भोजन आटोपून झाल्यानंतर झोपेत असताना गळा आवळून सुधाने आपली आई कुसुमचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मूळ गावी असलेल्या संपत्तीसाठी हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.