बेळगाव

Vijapur cylinder blast: सराफ बाजारात सिलिंडर स्फोट

विजापुरातील घटना : दोन सुवर्णकार गंभीर जखमी, गॅस गळतीचा संशय

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : येथील गजबजलेल्या सराफ बाजार परिसरातील शिरुर कॉम्प्लेक्समधील एका दागिन्यांच्या दुकानात कारागीर काम करीत असताना गुरुवारी (दि. १४) सकाळी मोठा गॅस सिलिंडर स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन सुवर्णकार गंभीर जखमी झाले. बिजू (वय ३८) आणि नाना हकीम (वय ४०) अशी जखमींची नावे असून दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे सुवर्णकार आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सकाळी कारागीर दुकानात भट्टीसंबंधित सोन्याचे काम कर होते. त्यावेळी गॅस गळतीमुळे अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की सारे काही हादरुन गेले. दुकानाचे शटर उडून गेले. त्यामुळे. परिसरातील दुकानांनाही हादरे बसले. संपूर्ण परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्यापारी तसेच पादचारी घाबरुन पळाले. स्फोटाचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या स्फोटात बिजू व नाना भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने ऑटो-रिक्षातून सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी विजापूर महापालिका आयुक्त विजय मेक्कळकी आणि गांधी चौकचे पोलिस निरीक्षक प्रदीप तलकेरी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाहनतळासाठी राखीव असलेले बेसमेंट व्यावसायिक वापरत असून जे शहरी बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते. शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम मंजूर आराखड्याचे उल्लंघन करुन सुरु आहे. या स्फोटप्रकरणी संबंधित इमारत मालकासह सुरक्षा नियमांचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांतून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT