खानापूर : पुढारी वृत्तसेवा
खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात तोराळी गावानजीक असलेल्या तोराळी येथील सीआरपीएफ कोब्रा कमांडो ट्रेनिंग सेंटरमधून एक जेण बेपत्ता झाल्याची तक्रार खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून सेवा बजावत असलेला जवान रतन बाबू (वय 39 वर्षं) राहणार भट्टीपरूलू तालूका रेपाली, जिल्हा गुंटूर, राज्य आंध्र प्रदेश, हा हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तोराळी येथील कोब्रा कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे डेप्युटी कमांडर मनीष कुमार यांनी खानापूर पोलीस स्थानकात एम रतन बाबू हा सोमवारी पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची किंवा इतर अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास खानापूर पोलिस स्थानक किंवा तोराळी येथील कोब्रा कमांडो ट्रेनिंग कॅम्पशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.